शासकीय जागेत असलेले मेडिकल शॉप २ तासात जमीनदोस्त… माणगाव नगरपंचायत अतिक्रमण विभागाची धडक कारवाई…

0
45

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-

माणगावमधील ट्रॅफिक जॅममुळे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे.माणगांव शहरातील मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी पाहता येथील अतिक्रमण हटविण्यासाठी पहिल्यांदा तत्कालीन प्रांताधिकारी शाम घोलप यांनी लक्ष घातले अतिक्रमण हटविले; पण पुन्हा स्थिती ‘जैसे थे’ झाली. आता मात्र नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम सुरु केली आहे. खरे तर माणगांव ग्रामपंचायत नगरपंचायतीमध्ये रुपांतरीत झाली आणि चांगले रस्ते, शुध्द पाणी पुरवठा,दिवाबत्ती, स्वच्छता-आरोग्य अनेक नागरी सोयी सुविधांना चालना मिळाली… शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माणगाव नगरपंचायत चे कर्तव्यदक्ष डॅशिंग नेतृत्व मुख्याधिकारी संतोष माळी यांनी शासकीय जागेत अतिक्रमण असलेले मेडिकल शॉप अवघ्या दोन तासात कारवाई करत जमीनदोस्त केले…या अतिक्रमण कारवाईकडे संपूर्ण माणगावकरांचे लक्ष वेधले होते… अखेर माणगाव नगरपंचातने ही कारवाई  करून मेडिकल शॉप जमीनदोस्त केले, ही कारवाई नगरपंचायत कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तसह करण्यात आली…याआधी देखील अशा मोहिमा राबवल्या गेल्या होत्या…परंतु काही दिवसांनी परिस्थिती तशीच पूर्ववत झाली अवैध प्रवाशी वाहतुकीच्या समस्येवर प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही…ही कारवाई दिखाव्या साठी होती की खरंच काही बदल घडणार आहे हे येत्या काही दिवसातच ठरणार आहे…