नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके) :-
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पनवेलकडून खोपलीकडे जाणाऱ्या मार्गावर सफेद पट्ट्या नसल्याकारणाने अपघातास निमंत्रण होत आहे… नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, आम्हाला ओवर स्पीडचा टोल देखील भरावा लागतो, तिथे विविध कॅमेरे देखील आहेत, परंतु तेथे स्पीड दर्शवणारा फलक नाही यासंदर्भात आरटीओ चलन प्राप्त केले होते… परंतु ते चलन भरण्यासाठी वाहन चालक-मालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे… नक्की हे चलन कोणत्या स्वरूपात व कोठे भरावे, याबाबत संभ्रम आहे…