नवीन पनवेल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन… रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन…

0
109

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):- 

नवीन पनवेल शहर व शाखा प्रमुख मृन्मय काने व शाखा प्रमुख संदेश बन्ने यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन नवीन पनवेल शहर शाखा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) येथे करण्यात आले….
शिबिराचे उद्घाटन रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आले…. या शिबिरात आपोलो हॉस्पिटल मार्फत ईसीजी, मधुमेह, बॉडी मसाज इंडेक्स, हाडांचे आजार, रक्तदाब तपासणी तसेच आइरीस आय हॉस्पिटल मार्फत मोफत नेत्र तपासणी व मोरया डेन्टल क्लिनिक सुकापुर यांच्या मार्फत दातांची तपासणीचे आयोजन करण्यात आले… या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला….

यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर प्रमुख अवचित राऊत, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, डॉ. आदेश बांदेकर, ( विभाग प्रमुख) बिपिन झुरे, (उपविभाग प्रमुख) जयंत पाखरे , ( शाखा प्रमुख) गोविंद जोग , ( शाखा प्रमुख) ओंकार धावडे , ( उपतालुका संघटिका ) तनुजा झुरे, प्रवीण चोणकर, विकास पोवळे, जयेश पाटील, प्रशांत भुजबळ यांच्यासह डॉक्टर्स, शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते….