भुवनेश्वर कालवा लगतची १७ घरे कायमस्वरूपी नावावर करावी… माजी नगरसेवक समिर सकपाळ यांची मागणी…

0
35

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-

रोहा नगरपालिकेच्या हद्दीतील कालवा रोड भुवनेश्वर परिसरातील १७ घरे हि राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार सरकारी जमिनीवर असलेली अनाधिकृत घरे हि मालकिची करता येतात… त्याच पद्धतीने प्रशासनाने हि १७ घरे त्यांच्या मालकीची करावी अशी मागणी रोहा नगरपालिकेचे माजी नगरसेवक समिर सकपाळ यांनी लेखी स्वरूपात पत्र खासदार सुनिल तटकरे यांच्या रविवार दि. ( ९ ) रोजी कडे दिले आहे.

दरम्यान रोहा नगरपालिकेचे हद्दीतील भुवनेश्वर परिसरातील नाना शंकर कालवा रोड लगत सर्वे नंबर २६८ /१ अ मधील अतिक्रमित शासनाची जागेची 2021 साली मोजणी झालेली होती परंतु जागेची सुधारीत मोजणी नकाशा भुमी अभिलेख व रोहा नगरपालिका उपलब्ध नसल्याने या १७ घराचा प्रश्न प्रलंबित आहे . त्यामुळे भुमी अभिलेख रोहाचा सर्वेअर माजी नगरसेवक समीर सकपाळ , शिल्पा धोत्रे यांनी कागदपत्र उपलब्ध करुन मोजणी केली होती .
समीर सपकाळ यांनी खा. तटकरेकडे मागणी पत्र देताच कार्यतत्पर खा. तटकरे यांनी थेट प्रांत ज्ञानेश्वर खुटवड यांना फोन करून सूचना देताना सांगितले की, रोहा नगरपालिकेच्या हद्दीतील भुवनेश्वर कालवा रोड लगत असणाऱ्या नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत लवकरच मिटिंग घ्यावी व हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा असे आदेश खासदार सुनिल तटकरे यांनी प्रांन्त यांना दिले . यावेळी रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यासह नगरसेवक व रोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित होते .