शिवसत्ता टाइम्स उरण (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यातील रायगड जिल्हापरिषद प्राथमिक बोरखार शाळेत सोमवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथी वर्गात शिकणाऱ्या नुपुर अनिल तांडेल वय वर्ष ९, संप्रदा रुपेश डाकी वय वर्ष ११, श्रेयाली विनायक मोकल वय वर्ष १२ आणि क्रिशल शक्ती पाटील वय वर्ष १० या विद्यार्थीनींनी परिपाठ न केल्याचा राग मनात धरून हैवान शिक्षक अशोक नामदेव कुटेने विद्यार्थीनींना छडीने, हाताने जबरदस्त, कानशिलात अमानुष मारहाण केली… मुलींच्या शरीरावर लाल आणि काळे वळ आले आहेत…. सदर प्रकार बोरखार गावातील ग्रामस्थांना समजताचा तात्काळ बोरखार शाळेळा आणि हैवान शिक्षक अशोक नामदेव कुटे याला घेराव घातला…
सदर वृत्त पोलीसांना कळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत, हैवान शिक्षक अशोक कुटे याला पोलीस बंदोबस्तात चिरनेर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे…. सदर मुलींची प्रकृती चिंताजनक असून तात्काळ उपचारासाठी उरण इंदिरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे…. सदर शिक्षक बोरखार शाळेवर गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत असून, त्याची बदली का झाली नाही, त्याला कोण पाठीशी घालत आहेत तसेच या अगोदर या शिक्षकाने असेच प्रकार केले आहेत… त्याची सखोल चौकशी करुन निलंबित करण्याची मागणी बोरखार – विंधणे ग्रामपंचायतचे सरपंच सौ. निसर्ग रोशन डाकी आणि राष्ट्रवादी नेते मच्छिंद्र ठाकूर आणि ग्रामस्थांनी लेखी पत्राद्वारे रायगड जिल्हा शिक्षणधिकारी यांना केली आहे….