संन्यासाच्या वेशात दुकानात भिक्षा मागण्यासाठी आला… कोणी नसल्याचा फायदा घेत दुकानातील मोबाईल चोरला…

0
39

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

नेरळ बाजारपेठ येथील महाराष्ट्र गिफ्ट शॉप येथील पहिल्या मजल्यावरील दुकानात एका संन्याशाच्या वेशात भिक्षुकी मागणाऱ्या संन्याशाने कोणी नसल्याचा फायदा घेऊन चक्क मोबाईल चोरी करून पोबारा केला आहे.
सदर घटना ही नेरळ येथे घडली असून दुकानातील गरीब मुलगी ही आतल्या खोलीमध्ये गेली असता हा भामटा मोबाईल घेऊन पळून गेला…ही घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.नेरळ परिसरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे…काही वेळाने ही बाब लक्षात येताच त्या भामट्याचा तपास घेण्याचा प्रयत्न करण्यास दुकानदार व इतरांना यश आले नाही…सदर घटना ही नेरळ पोलीस ठाण्यात नोंदवण्यासाठी गेले असता लाईट नाही म्हणून तक्रार घेतली नाही…तसेच सीसीटीव्ही फुटेज आम्ही चेक करू व कारवाई करू असे आश्वासन देण्यात आले..