“देव तारी, त्याला कोण मारी” या उक्तीप्रमाणेच कर्नाटकातील विजापूर जवळील बाबळेश्वर येथील सत्य घटना… 

0
42

मुंबई  शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे ) :- 

दि. ५ फेब्रुवारी २०२५ ची ही घटना… येथील सिद्धांत प्रभुणे या चिमुकल्याची जीभ टाळूला चिकटलेली होती त्यामुळे त्यांच्या जीवास धोका होता, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती शस्त्रक्रिया आवश्यक आहे असे सांगितले पण चिमुकल्याचा रक्तगट जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट OHH होता, ही बिकट समस्या होती…. अशातच त्यांच्या पालकांना महाराष्ट्रातील बॉम्बे ब्लड ग्रुपची माहिती मिळाली…. बॉम्बे ब्लड ग्रुपशी संपर्क साधून ते लागलीच सांगलीत आले आणि दैवयोगाने बॉम्बे ब्लड ग्रुपचे प्रमुख विक्रम यादव यांच्या अमोल प्रयत्नांनी या चिमुकल्या सिद्धांतची शस्त्रक्रिया यशस्वी होऊन प्राण वाचण्यास मदत झाली….

चिमुकल्या सिद्धांतचा ओएचएच OHH म्हणजेच “बॉम्बे ब्लड ग्रुप” असल्याचे निष्पन्न झाले पण या रक्तगटाचा एकही रक्तदाता कर्नाटकात नव्हता, अशातच सिद्धांतच्या पालकांना महाराष्ट्रातील बॉम्बे ब्लड ग्रुप डोनरची माहिती मिळाली… संपर्क साधून ते सांगलीत आले तोपर्यंत बॉम्बे ब्लड ग्रुपचे अध्यक्ष श्री. विक्रम यादव यांना ही माहिती मिळताच ते कोंकणातील दापोली तालुक्यातील आंजर्ले या गांवातील ओंकार धनावडे या OHH रक्तदात्याला घेऊन दापोली-मिरज बसने सांगलीत आले,  तेथे आणखी एक कोची येथील OHH रक्तदाता हनुमंत भोसले यासही सांगलीत बोलावून येथेच तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या दोन्ही रक्तदात्यांचे OHH रक्त आईस बॉक्समधून सिद्धांतच्या नातेवाईक मंडळींकडे सोपवण्यात आले दुर्मिळ रक्त मिळताच रात्री उशिरा चिमुकल्यावरची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडली आहे….

जगातील सर्वात दुर्मिळ OHH रक्तगटाच्या जगात ५४० तर भारतात १८० व्यक्ती आहेत… आंजर्ले येथील ओंकार धनावडे व कोची येथील हनुमंत भोसले या दोन्ही मराठी रक्तदात्यांनी केलेल्या ohh रक्तदानामुळे
विजापूर येथील चिमुकल्यावरील शस्त्रक्रिया दुर्मिळ रक्त मिळताच यशस्वी होऊन त्याचे प्राण वाचले… यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला…. दापोलीतील आंजर्ले येथील ओंकार धनावडे यांनी असे यापूर्वी आठ वेळा रक्तदान केले आहे…