मोहोप्रेच्या हद्दीत सोनगडाच्या पायथ्याशी पुरातन पादुका…? शंभर वर्षांपूर्वी सापडली होती हनुमंताची एक पुरातन मूर्ती…

0
42

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :- 

महाड-रायगड मार्गावर असलेल्या मोहोप्रे गावाच्या हद्दीत सोनगडाच्या पायथ्याशी शिवकालीन पादुका सापडल्याने इतिहास प्रेमींसह ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे… या पादुकांचे ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व काय आहे… ?

महाडपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी पुरातन दगडी पादुका सापडल्याची माहिती समोर आली आहे… विशेष म्हणजे, याच ठिकाणी शंभर वर्षांपूर्वी हनुमंताची एक मूर्तीही सापडली होती… त्यामुळे या भागाचा ऐतिहासिक वारसा मोठा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. सोनगड हा शिवकालीन काळात किल्ले रायगडाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठिकाण होते… येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आजही अस्तित्वात आहेत. आता या पादुका सापडल्याने इतिहासाचा नवा पैलू उलगडण्याची शक्यता आहे… पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पादुकांचे निरीक्षण केल्यानंतर त्यांचा कालखंड आणि महत्त्व स्पष्ट होईल…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडाच्या सुरक्षेसाठी सोनगड किल्ल्याला मोठे महत्त्व होते. यामुळे या भागात अनेक ऐतिहासिक वास्तू आजही दडलेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही… सोनगडाच्या पायथ्याशी सापडलेल्या या पादुका इतिहासाचा नवा शोध ठरणार का, याकडे इतिहास प्रेमींचे लक्ष लागले आहे… पुरातत्त्व विभागाचा अहवाल आल्यावर या शोधाचा पुढील प्रवास निश्चित होईल….