निगुडशेतच्या आई काळकाईचा माघोत्सव उत्साहात संपन्न… वैदिक मंत्रोच्चारात देवीवर अभिषेक व साजशृंगार चढवून विधीपूर्वक पूजा…

0
33

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-

तळा तालुक्यातील निगुडूशेत येथील जागृत देवस्थान श्री काळकाई देवीचा माघोत्सव बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रमाने अतिशय उत्साहात साजरा झाला.केतकीच्या जंगलातील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले श्री काळकाई देवस्थान सरफळे भावकीचे श्रद्धास्थान आहे.बुधवारी पहाटे वैदिक मंत्रोच्चारात देवीवर अभिषेक व साजशृंगार चढवून विधीपूर्वक पूजा करण्यात आली…यावेळी श्री सत्यनारायण पूजेचेही आयोजन करण्यात आले होते…या महोत्सवात ग्रामपंचायत सदस्य रामदास मोरे यांच्या सौजन्याने संभाजीनगर येथील ख्यातनाम कीर्तनकार महेश महाराज वेरुळकर व मुक्ताई महाराज वेरुळकर यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात महिलांचा हळदीकुंकवाचा समारंभ पार पडला. उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या उत्सवात माजी सरपंच रवी मांडवकर, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सभापती गीताताई जाधव तसेच पंचक्रोशीतील अनेक सरपंच मान्यवर उपस्थित होते…दिवसभर भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमासाठी पांडुरंग सरफळे रावसाहेब, भागोजीबुवा सरफळे,महादेव सरफळे, जनार्दन सरफळे, सखाराम सरफळे, अनिल सरफळे, नामदेव सरफळे, रामचंद्र सरफळे, महिला मंडळ, मुंबईतील सरफळे भावकी युवक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. माघोत्सव महोत्सवाची सायंकाळी हरिपाठ व रात्री भजनाने सांगता झाली…