पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी) :-
पेण तालुक्यातील वडखळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाशी गावातील जगदंबावाडी येथील बंद घराचा दरवाज्या तोडून १,३४,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले….
सविस्तर घटना अशी की, वडखळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ८ फेब्रुवारी व ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान मौजे वाशी येथे घर नं ए ६२, जगदंबावाडी, मु. पो. वाशी, ता. पेण फिर्यादी यांच्या घरात कोणीही नसताना अज्ञात इसमाने घराच्या समोरील दरवाज्याची कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करुन घरातील बंद कपाटाचे लॉक तोडून एकूण १,३४,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळविले…
याबाबत वडखळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ०७/२०२५ भा.दं.वि.क. ३०५ A,३३१ (३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव हे अधिक तपास करीत आहेत…