रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक निंदनीय प्रकार समोर आला आहे. रोहा तालुक्यातील अष्टमी वरचा मोहल्ला येथे भाड्याने राहणाऱ्या जमालहुसेन जालीमुद्दीन मीहार या आरोपीच्या घरी गोमांस असल्याची माहिती परिसरात पसरतात संपूर्ण परिसरात खळबळ पसरली होती. याची माहिती रोहा पोलीस स्टेशनला कळताच रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे ,गोपनीय अंमलदार जयेंद्र पेडवी, पोलीस सब इन्स्पेक्टर खतीब ,पोलीस हवालदार पाटील,पोलीस हवालदार पायगुडे, पोलीस कॉन्स्टेबल कोटकर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाहणी केली असता एका जर्मन च्या भांड्याच्या टोपामध्ये साधारण दोन ते तीन किलो इतके गोमांस आढळून आले.त्यानंतर याची चौकशी केली असता यातील आरोपी जमाल जलीमुद्दीन मिहार ,वय 32 वर्षे याने तेथून पळ ठोकलेला.परंतु काहीच अवधीनंतर पोलिसांनी त्याचा तपास घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत 325 ,प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 ५ (a) ,५(b) ,५(c), बी एन सी 2023 अंतर्गत ३(५) असे गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु होणाऱ्या या सातत्यपूर्ण घटनेने रोह्यातील हिंदू संघटना ही रोहा पोलीस स्टेशन येथे आक्रमक झालेली पाहायला मिळाली. मुळात हे गोमांश येतं कुठून? गोमातेची हत्या कुठे करण्यात येते? हे सरकार हिंदुत्ववादी आहे का? असे प्रश्नचिन्ह सुद्धा हिंदुत्ववादी संघटनेकडनं उपस्थित केले गेले. संबंधित घटनेने रोहा पोलीस स्टेशन येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, पोलीस उपाधीक्षक रवींद्र दौंडकर यांनी तात्काळ रोहा पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन , संबंधित घटनेची खोलवर तपास करून मुख्य आरोपींना लवकरात लवकर शोधून कारवाई करू असे नागरिकांना आश्वासित केले आहे. रोह्यात अशा घटना गेल्या वर्षभरातून सातत्याने होत आहेत. या गंभीर घटनेकडे स्थानिक आमदार महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री नामदार अदिती तटकरे या लक्ष देणार का? हे देखील पाहणे गरजेचे ठरणार आहे…