कुणबी समाजोन्नती मंडळ महाड गटाच्या महिला अध्यक्षपदी सौ. मयुरी भुवड तर सेक्रेटरीपदी सौ. तेजश्री अंबावले यांची निवड…. 

0
38

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-

महाड – कुणबी समाजोन्नती मंडळ महाड गटाची सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी कुणबी समाज हाॅल नवेनगर येथे संपन्न झाली… यावेळी  महिला अध्यक्षा सौ. ललिता म्हाके यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या कुणबी समाजोन्नती मंडळ महाड गट महिला अध्यक्षपदी सौ. मयुरी राजेश भुवड यांची एकमताने निवड करण्यात आली…. यावेळी महाड गटाचे अध्यक्ष श्री. सुदेश बाईत, उपाध्यक्ष  श्री. दगडू पिंगळे, सेक्रेटरी श्री. राजेंद्र काप,  श्री. दत्ताराम कदम, ज्येष्ठ सल्लागार श्री. गणपत पापले, श्री. अशोक खांबे, महीला मंडळ माजी अध्यक्षा सौ. ललिता म्हाके,  सौ. पूजा  चव्हाण, श्वेता कदम, तेजश्री अंबावले आदी उपस्थित होते…

यावेळी प्रथम मागील इतिवृत्त वाचून मंजुरी देण्यात आली…. यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली…. यामध्ये महाड गट महिला अध्यक्षा म्हणून सौ. मयुरी भुवड-महाड, उपाध्यक्षपदी सौ. जागृती धर्मेंद्र चिनकाटे-दाभेकर कोंड, सेक्रेटरी सौ. तेजश्री अंबावले – किंजळोली, उपसेकेटरी सौ. कविता  प्रशांत घाणेकर-घुरूपकोंड, उप सेक्रेटरी सौ. अश्विनी निलेश केंद्रे – पिंपळकोंड यांची निवड करण्यात आली. नविन कार्यकारिणीचे सर्वानी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…. तसेच यावेळी तालुका कमिटीसाठी सौ. ललिता बबन म्हाके, सौ. श्वेता चंद्रकांत कदम, सौ. पूजा पांडुरंग चव्हाण, सौ. सुजाता भिकु कासरूंग, सौ. निवेदिता नितीन बटावले या महिलांची नावे देण्याचे ठरविण्यात आले… अशाप्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली…