गेल कंपनीतील पाईप लाईन भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करा:काशिनाथ पाटील… पेणचे शेतकरी गुरुवार पासून उपोषणाला बसणार…

0
27

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी) :-

गेल (गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) कंपनीच्या पाईप लाईनसाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी पेण उपविभागिय कार्यालयासमोर दिनांक २०/०२/२०२५ रोजी बाधित शेतकरी उपोषणास बसणार आहेत… याबाबतचे लेखी निवेदन संबंधित अधिकारी यांना दिले असल्याचे २४ गाव सेझ विरोधी शेतकरी संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच काशिनाथ पाटील यांनी सांगितले आहे…

गेल (गॅस अँथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) कंपनीची पाईप लाईन ही पेण तालुक्यातील रावे, कोपर, डावरे, हनुमानपाडा, जोहे, कळवे, कणे, बोझें, ओढांगी, वाशी, बोरी, वडखळ, शिर्की, बोर्वे, मसद आदी गावातील शेतकऱ्यांच्या सुपिक शेतजमिनीतून जात आहे…. या पाईप लाईनसाठी पेण तालुक्यातील १३ गावांतील अनेक शेतकऱ्यांची जमिन संपादन होणार आहे… हे सर्वच शेतकरी अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत…. या सुपिक शेतजमिनी शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे जीवन धारणेचे साधन आहे… या पाईप लाईनच्या संपादनामुळे वरील सर्व गावातील शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे प्रचंड नुकसान होणार आहे… या गॅस लाईनमुळे हमरापुर विभाग, वाशी विभाग, वडखळ विभाग पुर्णतः उध्वस्त होऊन पाईप लाईन लगतच्या परिसरातील नागरीकांचा, रहिवाश्यांचा सुरक्षीततेचा व जिविताचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे… त्यामुळे या भूसंपादनासाठीच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांचा पुर्णपणे विरोध आहे… तसे वेळोवेळी शेतकऱ्यांनी संबंधीतांना कळविलेले असल्याचे काशिनाथ पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले…

गेल (गॅस अधोरिटी ऑफ इंडिया लि.) कंपनीच्या पाईप लाईन्ससाठी संपादना करीता यापूर्वी उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी (महाराष्ट्र राज्य) गेल इंडिया लिमिटेड सी.बी.डी. बेलापूर यांनी भारत सरकारचे राजपत्र भाग २ खंड ३उपखंड (II) (ता. १८/११/२०२५ मधील जाहीरनामा प्रसिध्द करण्या सबंधित शेतकऱ्यांना ३(१) च्या नोटीसा व सुनावणीच्या नोटीस बजावणे, शेतकऱ्यांच्या प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्याचे काम पुर्ण झाले असून, संपादनाच्या प्रत्येक पायरीवर सबंधीत शेतकऱ्यांनी आतापर्यंत या सर्व प्रक्रियांना शांततेच्या मार्गाने संपादनास रितसर लेखी व तोंडी विरोध नोंदवून वेळोवेळी हरकती घेतल्या आहेत… तरीही जबरदस्तीने हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे, म्हणून गेल (गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) कंपनीच्या पाईप लाईनसाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर गुरुवार २०/०२/२०२५ रोजी बाधित शेतकरी उपोषणास बसणार असल्याचे पाटील यांनी सांगितले….