रोह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी….मेहेंदळे हायस्कूल ते रोहा तहसील कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन…

0
23

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव ) :-

रोहा तहसीलचे नायब तहसीलदार श्री राजेश थोरे यांच्या हस्ते कोकण एज्युकेशन सोसायटीचे मेहेंदळे हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी त्यांच्यासोबत मेहेंदळे हायस्कूलचे प्राचार्य रमेश मोसे, शिक्षक वृंद आणि शालेय विदयार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी शिवगर्जना,लाठी काठी,भाषणे,पोवाडे आदी कार्यक्रम साजरे करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.कोकण एज्युकेशन सोसायटीचे मेहेंदळे हायस्कूल ते रोहा तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून लेझीम पथकासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत संपूर्ण रोहे शहर दुमदुमून सोडले.रोहा तहसीलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती साजरी करण्यासाठी रोहा तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांच्यासोबत नायब तहसीलदार श्री राजेश थोरे व कर्मचारी तसेच मेहेंदळे हायस्कूल चे सर्व सेवक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना विद्यालयातील एन. सी. सी. रायफल ट्रूप तर्फे रायफल सलामी देण्यात आली.तसेच एनसीसी कॅडेट्स पूजा शिवाजी केंद्रे, प्रगती मनगुतकर,हर्षद हनुमंत पवळे यांनी भाषणे देत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागा केला…