खोपोली शहरात रात्री बारा वाजता शिवजयंतीचा जल्लोष… छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारो शिवप्रेमी एकत्र…

0
23

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):- 

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंती निमित्त खोपोली शहरात दर वर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. रात्री बारा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या छत्रपतींच्या आश्वारूढ पुतळ्या समोर मोठा जन्मोत्सव होतो.यावर्षीही हजारो शिवप्रेमी खोपोलीकर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री बारा वाजता राज्यांना वंदन करायला जमले होते. खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह मान्यवरांनी छत्रपतींची आरती केली.फटाक्यांची आतिशबाजी व शिवरायांच्या घोषणानी खोपोलीचा आसमंत दुमदुमला होता.सर्वत्र जल्लोष पहावायास मिळत होता…