महाड शिवसत्ता टाइम्स निलेश लोखंडे
वेदा जनजागृती मंच आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त समाजसेवक डॉक्टर दिगंबर गीते यांचे व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे संपन्न झाले… हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महापराक्रमी, महाबलवान, धाडसी, शूरवीर योद्धा स्वराज्य रक्षक व छ.शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो….राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता… जाणता राजा एकच होऊन गेला, इतिहासाच्या पानात आपले नाव कोरून गेला…. अशी करारी नजर सदा गनिमी भेदुनीपाही आरपार, शिवरायांमुळे झाले स्वप्न साकार…
अंधार फार झाला आता दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे… सिंहासारखा गरजला तो शिवबा राजा होता, स्वराज्याचे स्वप्न उराशी तो जिंकणारा होता… धर्मन्याय प्रजेसाठी तलवारीचा वार केला, शत्रूवर वज्रासारखा प्रहार केला… माता जिजाऊंच्या आशीर्वादाने पराक्रम त्याने गाजवलं, मराठ्यांच्या मातीसाठी जीवन अर्पण करून गेले, जय भवानी जय शिवाजी….
आज 19 फेब्रुवारी 2025 शिवजयंती निमित्त आपण जमलो आहोत त्यानिमित्त सर्वांना वेदा जनजागृती मंचातर्फे हार्दिक शुभेच्छा… छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला…
आईचे नाव जिजाऊ साहेब वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून येणाऱ्या अनेक बलाढ्य मोगल सरदारांचा पराभव केला, त्यात औरंगजेब, शाहिस्तेखा यांना धुळीस मिळवले आणि अफजलखानाचा वध केला… महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली… राज्यात अनेक किल्ल्यांची निर्मिती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक रयतेच्या कल्याणकारी योजना अंमलात आणल्या… १८ पगड जाती जमातीचे लोक सुख समाधानाने नांदत होते…. अखेर शेवटी तीन एप्रिल १६८० साली महाराज काळाच्या पडद्यावर गेले… जय भवानी जय शिवाजी… भारत माता की जय… वंदे मातरम वंदे मातरम… जय महाराष्ट्र….!