पोलादपूर कापडे येथे जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी… पोलादपूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी 14 जणांवर गुन्हा दाखल…

0
30

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):- 

पोलादपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी जितेंद्र रामचंद्र सपकाळ यांच्या जागेत आरोपी यांनी बोरवेलचे काम चालू केले यानंतर फिर्यादी यांनी जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत येथे काम करायचं नाही असे म्हटल्यानंतर संबंधित आरोपी यांनी त्यांना हाताबुक्कीने मारहाण केली व दमदाटी केल्याची तक्रार जितेंद्र सपकाळ यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात केली आहे…तसेच त्यांच्याविरुद्ध असलेले फिर्यादी संतोष सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित जागेचा विषय हा न्यायप्रविष्ठ असताना संबंधितांनी जागेवर काम सुरू का केले याचाच जाब विचारण्याकरिता गेले असता आरोपी यांनी हाताबुक्कीने मारहाण करून जीवे ठार मारणार असल्याची धमकी दिली याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाणे येथे एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी जितेंद्र रामचंद्र सपकाळ, प्रतीक जितेंद्र सपकाळ, सोहम संदेश सपकाळ, गणेश राजेंद्र सपकाळ व अन्य अज्ञात चौघां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे तर संतोष गणपत सपकाळ, गणपत सपकाळ, सुनिता गणपत सपकाळ, सचिन शेठ तसेच अन्य अज्ञात दोघां विरोधात असे एकूण परस्पर विरोधी 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परस्पर विरोधी भांडणांमध्ये चौघेजण जखमी असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळाली आहे.पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जागडे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.