पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
JSW कंपनीची टॉवर लाईनच्या कामाबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयात दि. २१/०२/२०२५ रोजी सकाळी ११-३० वाजता ग्रामस्थ, महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी व जनरल मॅनेजर JSW स्टील लि. डोलवी, पेण
यांचे समवेत एकत्रित सभा आयोजित केली होती…
JSW कंपनीच्या टॉवर लाईनचे काम सुरू असून, सदर लाईन ही शेतीच्या मध्यभागातून जात आहे…. त्यामूळे शेतक-यांचे अतोनात नुकसान होऊन भविष्यात कोणताही नवीन प्रकल्प आमच्या शेतात होणार नाही…. याबाबत टॉवर लाईन टाकणेबाबत अटी व शर्ती नमूद करून अधिकारी वर्ग व कंपनी मालक यांची एकत्र सभा बोलावून अर्टीची लेखी मान्यता द्यावी तरच आम्ही सदरील टॉवर लाईनला ना हारकत देऊ अन्यथा शेतक-यांच्या सदरील टॉवर लाईनला संपूर्ण विरोध आहे… याबाबत ग्रामस्थांनी जनसुनावणी घ्या नाहीतर काम बंद ठेवा असा इशारा देण्यात आला आहे…. तसेच ग्रामस्थ मंडळ आमटेम, आनंदनगर-जुई अब्बास, धाऊळपाडा, निगडे, पालखार, कासू घुंटवाडी, शेतपळस, कासू-पाटणी पांडापुर इ. ग्रामस्थांनी JSW कंपनीसाठी कानसई नागोठणे ते डोलवीपर्यंत शेतक-यांच्या सुपीक शेतीतून भूसंपादनाची कोणतीही कायदेशीर शासकीय प्रक्रिया न करता बाधित, शेतकरी, ग्रामस्थांना विश्वासात न घेता स्थानिक ग्रामपंचायतीची ना हरकत दाखल न घेता बेकायदेशीर पद्धतीने टॉवर्स उभारण्याचे काम सुरू असून, कंपनीच्या सदरच्या कृतीमुळे संबधित विभागामध्ये शेतक-यांमध्ये असंतोष असून, शेतक-यांच्या जीवीतास धोका निर्माण होणार असून कायदा सुव्यवस्था बिघडून सामाजिक स्वास्थ्य बिघडणार आहे… यावेळी शेतकऱ्यांची मागणी होती जनसुनावणी लावातर काम चालु करा जोपर्यत मोबदला मिळत नाही तोपर्यत शेतकरांचा लढा चालु ठेवणार असे वैकुंठ पाटील व संजय म्हात्रे सांगातले….