श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
पवित्र जल तसेच सभागृहाचे भूमी पूजन व वचन पूर्ती लोकार्पण सोहळाचा कार्यक्रम श्रीवर्धन तालुक्यात मंगळवार दि. १८ फेब्रुवारी, २०२५ रोजी उत्सहाच्या वातावरणात संपन्न झाला…. राजकीय, शिक्षण त्याचबरोबर सामाजिक कार्यात सर्वात आघाडीवर असलेल्या आणि शब्दाला जागणाऱ्या कोकणातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजा भाऊ ठाकूर यांनी श्रीवर्धन तालुक्यातील निगडी येथे पिण्याच्या पाण्याची सोय आणि बोर्ली पंचटण जवळील असलेल्या वडवली गावात नूतन सामाजिक सभागृहाच्या पायाभरणीचा लोकोपोयोगी उपक्रम त्यांच्या उपस्थितीत दुपारी निगडी तर सायंकाळी वडवली येथे पार पडला…
निगडी गावात सुमारे १० हजार लिटरच्या सिन्टेक्स टाकी, सिमेंट काँक्रीट फौंडेशन प्लॅटफॉर्म, पाईप कनेक्शन जोडणी करुन देण्याचे वचन दिले होते… तर वडवली येथे “श्री. शिवरदेवआळी” वडवली सभागृहाच्या ईमारतीसाठी आपण मदत करू असे आश्वासन दिले… तर या शब्दाला कृतीच्या रूपाने सत्यात आणून सदर कामास चालना म्हणून दहा लाख रुपये देऊन कामाच्या पायाभरणी सोहळ्यास सुरुवात केली…
यावेळी निगडी ग्रामस्थ तसेच महिला मंडळ यांनी राजा भाऊ यांचे स्वागत करुन उपलब्ध करुन दिलेल्या पिण्याच्या पाण्याची सोय करुन दिली, त्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांचे विशेष आभार मानले…. यावेळी राजा भाऊ ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच फित कापून उदघाटन सोहळा पार पाडला… यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते…. राजा भाऊ यांनी मेन पाईप लाईनचे कॉक चालू करुन अनेक घरांना भेट देऊन अंगणातील नळाची चावी उघडून ग्रामस्थांची अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर केल्याचे पाहायला मिळाले… तसेच गावातील अनेक वृद्ध नागरिक विशेष करुन महिला वर्ग यांनी राजा भाऊ यांना आशीर्वाद दिले… यानंतर राजा भाऊ ठाकूर यांच्यासह सर्व पाहुण्यांचा स्वागत, सत्कार आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली….
यावेळी राजा भाऊ ठाकूर, ज्येष्ठ नेते सदानंद येलवे, विलास सुर्वे, दिनेश खैरे यांनी भाषणाद्वारे आपले मत व्यक्त केले…. त्यानंतर वडवली या गावात सायंकाळी 06:00 च्या सुमारास राजा भाऊ यांचे आगमन होताच ग्रामस्थांनी राजा भाऊ ठाकूर यांचे स्वागत केले…. यावेळी ढोलताशा आणि फटाक्यांच्या आतशबाजीने राजा भाऊ यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी रस्ता, गल्ली येतील लोक राजा भाऊ यांना नमस्कार करुन त्यांचा बरोबर सोबत भूमी पूजनच्या ठिकाणी पोहचले. तर थेथे राजा भाऊ यांचे महिला वर्गाने औक्षण करुन स्वागत केले… दरम्यान विधी पूजा पार पडल्यानंतर राजा भाऊ व बांधकामाची जबाबदारी घेतलेल्या कारागिरांनी सुमारे आठ फूट खोदलेल्या खड्ड्यात शिडी मार्फत उतरून श्रीफळ वाढवून पायाभरणीच्या वीट व सिमेंट कॉलम जागेत ठेवून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली… यानंतर राजा भाऊ यांचा शानदार सत्कार करण्यात आला…
राजा भाऊ यांच्या बरोबर आलेल्या सर्व पाहुणे व पत्रकार यांचेही स्वागत करण्यात आले… यावेळी राजाभाऊ ठाकूर यांच्याबरोबरच शशिकांत पवार, विलास सुर्वे, सदानंद येलवे यांची भाषणे झाली…. या दरम्यान सदर समाज मंदिर इमारत साठी लागणारा निधीचा खर्च 10 लाख रुपय राजा भाऊ ठाकूर वैयक्तिक देणार असल्याचे कबूल केला आहे. सोहळा कार्यक्रम संपन्न झाल्यावर राजा भाऊ यांनी वडवली, श्रीवर्धन तसेच म्हसळा येथील काही प्रमुख कार्यकर्ते यांची भेट घेतली… राजा भाऊ ठाकूर यांच्या संपूर्ण दौऱ्यांच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते सदानंद येलवे, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे सचिव डॉ. नरेंद्र सिंग, माणगाव ता. अध्यक्ष विलास सुर्वे, म्हसळा न. पंचायत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सन्माननीय सुफियान हलदे, श्रीवर्धन ता. उपाध्यक्ष इम्तियाज कोकाटे, सचिव गणपत गमरे, कार्यकर्ते दिनेश खैरे, फारुख परकारसह आधी उपस्थित होते….