प्रयागराज शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कुंवर श्री हरिवंश सिंहजी,माजी खासदार प्रतापगड, यांचे काल प्रयागराजमध्ये आगमन झाले…त्यांच्यासोबत मुंबईहून आलेले प्रसिद्ध उद्योजक योगेश तांडेल आणि त्यांचे भाचे अजीत सिंह देखील उपस्थित होते…राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वागतासाठी प्रयागराज विमानतळावर अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. त्यामध्ये राष्ट्रीय मंत्री श्री कृष्ण बहादुर सिंह, विंध्य प्रदेश उपाध्यक्ष अमित सिंह, विंध्य प्रदेश महासचिव शिववीर सिंह, मंडळ अध्यक्ष सुरेश प्रताप सिंह, सैनिक प्रकोष्ठाचे मंडल अध्यक्ष संजय कुमार सिंह फौजी, गंगापार जिल्हाध्यक्ष कमलेश प्रताप सिंह आदींचा समावेश होता.
विमानतळावरून निघाल्यानंतर माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांची टीम झालवा येथील ट्रिपल आयटी गेस्ट हाऊस येथे पोहोचली. तेथे प्रो. डॉ. ए. के. सिंह यांनी त्यांचे स्वागत करून जलपानाची व्यवस्था केली…त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष विंध्य प्रदेश अध्यक्ष कृष्णन सिंह यांच्या जॉर्जटाउन येथील निवासस्थानी पोहोचले.या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी मंडल संरक्षक इंजिनियर शिव शंकर सिंह, प्रदेश महामंत्री रवि करण सिंह तोमर, डॉ. आनंद प्रसाद सिंह, मंडल महामंत्री दिग्विजय सिंह मुन्ना, मंडल संगठन मंत्री जन्मेजय सिंह, इलाहाबाद विद्यापीठाचे क्रांतिकारी विद्यार्थी नेते आदर्श भदौरिया आणि त्यांच्या टीमसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. माननीय राष्ट्रीय अध्यक्षांचे यथोचित स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला.भोजनानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अरैल गेस्ट हाऊससाठी रवाना झाले…व सकाळीच त्यांनी प्रयागराजच्या पवित्र संगमात स्नान केले असून, त्यानंतर त्यांनी आपल्या गृह जिल्हा जौनपूरकडे प्रस्थान केले आहे…
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री सूर्य प्रताप शाही देखील संगमस्नान करताना उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते…प्रयागराज दौऱ्यात अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या संघटनशक्तीचे दर्शन घडले…संपूर्ण स्वागत सोहळा उत्साहात पार पडला.