पनवेल म.न.पा.तील विविध समस्यांविरोधात धरणे आंदोलन… पनवेल महापालिकेत देण्यात आले निवेदन…

0
26

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पनवेल महापालिकेतील विविध समस्यांविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले आहे… यावेळी पनवेल महापालिकेमध्ये निवेदनाद्वारे जाचक मालमत्ता कर रद्द करणे, पाणी समस्या लवकरात लवकर सोडवणे, महानगरपालिकेत स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावे, निकृष्ट नाल्यांची व रस्त्यांची निःपक्षपातीने चौकशी करणे, अर्थ संकल्पात महिला, शिक्षण, आरोग्य याबद्दल तरतूद करण्यात यावी व प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ही एस.आर.ए. योजनेप्रमाणे राबवावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत…

यावेळी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नंदराज मुंगाजी, युवा तालुका अध्यक्ष हेमराज म्हात्रे तसेच महिला आघाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या… या समस्यांवर तोडगा न निघाल्यास पुढील आंदोलनाचे मोर्च्यात व्यापक रूपांतर होईल, असे काँग्रेस नेते सुदाम पाटील यांनी पनवेल महापालिकेमध्ये निवेदन देत सांगितले…