अलिबागमधील किहीम बीचवर कासवाने घातली दीडशे अंडी… किहीम ग्रामपंचायत आणि वनखात या दोघांच्या मदतीने कासवांच्या अंड्यांना संरक्षण…

0
52

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

अलिबागमधील निसर्गसौंदर्याने नटलेल्या किहीम समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांनी दीडशे अंडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा की ही समुद्रकिनारा हा कासव संवर्धनासाठी सुरक्षित असल्याचं दिसून येते. ऑलिव्हरीडले जातीच्या कासवांना अंडी घालण्यासाठी शांत आणि सुरक्षित जागा हवी असते. त्यामुळे अलिबाग मधील स्वच्छ आणि सुंदर असलेल्या की हिम समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांनी अंडी घालण्यासाठी पसंती दिल्याचे पाहायला मिळते आहे…