पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
पेण तालुक्यात खारभूमी खात्याचा कारभार पूर्णपणे ढासलळा असून तालुक्यातील गणपती बाप्पाच्या मूर्तींचे गाव म्हणून जगभरात ओळख झालेल्या जोहे खार दुतर्फा भागातील भातशेतीत समुद्राचे खारेपाणी शिरल्यामुळे शेकडो एकर भातशेती खाऱ्या पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे.सोमवारी रात्री आलेल्या भरतीमुळे खारे पाणी जोहे, कळवे गावाजवळील खार दुतर्फा, बोरली, डोलवीदबाबा या भागातील भात शेती पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतीत झाला आहे.
कोपर कोकेरी या स्कीमवर दहा कोटीचं टेंडर निघालेला आहे. त्याच प्रमाणे सोनखार-उरणोली स्कीमवर पाच कोटीचा टेंडर निघालेला आहे. तसेच कोपर स्कीमवर कित्येक वेळा लाखो रुपयांची काम प्रत्येक वेळी केली जातात परंतु एकदा पावसाला आला की पूर्णपणे ती बंदिस्ती वाहून जाते. मग खालॅण्ड विभागाचा पैसा जातोय कुठे ? असा सवाल शेतकरी वर्ग करत आहे. तर याच स्कीमवर गणपतीच्या अगोदर पंधरा लाखाचं काम केलं असं दाखवलं आणि बिल ही काढलेला आहे. त्याच स्कीमवर पाच वेळा काढलेली आहेत.
मात्र प्रत्यशात कामे केली नसल्यमुळेच बंदिस्तीला खांडी जात आहेत. त्यामुळे खारे पाणी शेतीत जाऊन शेतीचे नुकसान होत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी खारभूमी खात्याकडे पत्रव्यवहार करून त्यांच्या निदर्शनास दिली असल्याचे जोहे शेतकरी संघटनेचे काशिनाथ पाटील यांनी बोलताना सांगितले…