१७ मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर धरणे सत्याग्रह आंदोलन… आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी…

0
16

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

महाड तालुक्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी महाड पंचायत समितीसमोर धरणे सत्याग्रह आंदोलन केले… ६ मार्च २०२५ रोजी सकाळच्या सत्रात २ तास आंदोलन करण्यात आले… आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारकडे १७ प्रमुख मागण्या मांडल्या… यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, वेतनवाढ, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे, रिक्त पदे भरती आणि सेवासुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे…

महाड पंचायत समितीसमोर मोठ्या संख्येने कर्मचारी एकवटले होते… घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला… कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी प्रशासनाला निवेदन सादर करून तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली… सरकारने जर यावर त्वरित पावले उचलली नाहीत, तर पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे…