जिते येथे अज्ञात वाहनाची मोटरसायकलला भीषण धडक… जोरदार धडकेत मोटरसायकलस्वराचा जागीच मृत्यू…

0
20

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमूलकुमार जैन):- 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरु असतानाच पुन्हा एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे… मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या जिते येथे अज्ञात वाहनाची ठोकर मोटर सायकलला लागल्याने मोटर सायकलस्वार दिनेश दत्ताराम पाटील हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती दादर सागरी पोलिस ठाण्यात मृत याचा भाऊ कौस्तुभ दत्ताराम पाटील,( वय २४ वर्षे, रा- म्हैसबाड खारपाले, ता.पेण) याने दिली आहे…

याबाबत सविस्तर माहिती अशी की,मृत दिनेश दत्ताराम पाटील हा आपल्या ताब्यातील बजाज कंपनीची पल्सर २०० मोटारसायकल क्र. एमएच ०६ सीसी ३४९५ ही चालवत मुंबईतील चुनाभट्टी येथे जात असताना मुंबई गोवा हायवे रोडवर जिते आरटीओ ऑफिससमोर कोणत्यातरी अज्ञात वाहनाची जोरदार ठोकर लागून भीषण अपघात झाला… या अपघातात दिनेश दत्ताराम पाटील यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला… अपघातात ठोकर दिलेला आरोपी घटनेची खबर न देताच पळून गेला… याबाबत दादर सागरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे…