करुणा शिंदे सर्व विकास दीप तर्फे महिला दिनी सन्मानित….. 

0
34

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-  

१९९७ साला पासून होमगार्डमध्ये सेवा बजावत असलेल्या करुणा शिंदे यांचा यथोचित सन्मान नुकताच संपन्न झालेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात करण्यात आला… सदर सन्मान नामांकित संस्था सर्व विकास दीप तर्फे करण्यात आला… करुणा शिंदे यांचा सन्मान सर्व विकास दीप संस्थेचे अध्यक्ष थॉमस भाऊ यांच्या हस्ते सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आला….

सन्मानापूर्वी करुणा शिंदे यांचा अल्प परिचय तसेच त्यांचा २८ वर्ष सेवे बद्दल माहिती देऊन त्यांच्या योगदानाची  दखल घेऊन हा गौरव करण्यात आला…. यावेळी करुणा शिंदे सन्मानित झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझ्या आयुष्यात प्रथमच माझा सन्मान झाला आहे त्यामुळे मी अतिशय भरावून गेले आहे… त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित राहण्याचाही मला आनंद अतिशय झाला आहे… काही वर्षा पूर्वी एका स्पर्धेत जिंकल्याने मला बक्षीस मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले…. माझा सन्मान होमगार्ड सेवेत मी गेली अनेक वर्ष सेवा देत आले आहे आणि याची दखल सर्व विकास दीप संस्थेनी घेऊन महिला दिनी माझा सन्मान केल्या बद्दल मी संस्थेचा मनापासुन आभार व्यक्त करते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले…. यावेळी करुणा शिंदे यांचा पुस्प गुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले…  यावेळी प्रचंड टाळ्यांच्या गजरात करुणा शिंदे यांचे अभिनंदन करून कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या…