रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील नामवंत असलेल्या अल्काईल अमाइन्स केमिकल्स लिमिटेड आणि बॉम्बे डाईंग कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पाताळगंगा-रसायनी परिसरातील लोकप्रिय ठरलेला सांस्कृतिक कार्यक्रम प्रेरणा जल्लोष २०२५ ची यशस्वी सांगता आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. मोहोपाडा येथील बॉम्बे डाईंग कॉलनीत झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला मोहोपाडा वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.उमाताई मुंढे, अल्काईल अमाईन्सचे वरिष्ठ व्यवस्थापक (एच.आर.) श्री.मॅथ्यू डीकुन्हा, वर्क्स मॅनेजर श्री.नागनाथ खटकाळे, कंपनीच्या एच आर सौ. अर्चना माने,बॉम्बे डाईंग कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट श्री.बी.पी.मिश्रा,जनरल मॅनेजर (पी अँड ए ) श्री. सोमेश्वर काळे,प्रेरणाचे शिलेदार श्री.के.आर. ओंकार,यांच्यासह बॉम्बे डाईंग कंपनी व अल्काईल अमाइन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी पत्रकार मित्र,विद्यार्थी, शिक्षक,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महिलामंडळ,रसायनी-पाताळगंगा पंचक्रोशीतील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि कलाकारांना प्रोत्साहन मेळावे म्हणून दरवर्षी प्रेरणा जल्लोष एक हक्काचं व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध करून देत असते.प्रेरणा जल्लोष या कार्यक्रमात बालकलाकारांपासून ते छोट्या-मोठ्यांनी सहभाग घेत आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
उपस्थित मान्यवरांनी सर्व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आणि सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुकही केले. नाविन्यपूर्ण सांस्कृतिक स्पर्धांच्या विजेत्यांना भरघोस बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावर्षी मुख्य प्रायोजक अल्काईल अमाइन्स केमिकल्स लिमिटेड यांना सह प्रायोजक म्हणून बॉम्बे डाईंगने यांनी विशेष सहकार्य करत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.पुढच्या वर्षी अजून मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आश्वासन स्पर्धक आणि प्रायोजकांनी दिले. दि.४मार्च ते १२मार्च पर्यंत सर्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बॉम्बे डाईंगचे जनरल मॅनेजर श्री.सोमेश्वर काळे,अल्काईल अमाइन्सच्या एच.आर. सौ.अर्चना माने,प्रेरणाचे के.आर.ओंकार,रवी ओंकार आणि सर्व सहकारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.प्रेरणा जल्लोष च्या टीमचे खास अभिनंदन बॉम्बे डाईंगचे व्हाइस प्रेसिडेंट श्री.बी.पी.मिश्रा, अल्काईल अमाइन्सचे वरिष्ठ अधिकारी (एच. आर.)श्री.मॅथ्यू डीकुन्हा यांनी प्रशस्तिपत्रक आणि स्मृतिचिन्ह देऊन केले.