नेरळ शिवसत्ता टाइम्स (शितल शिर्के):-
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार ३९५ व जन्मोत्सव सालाबाद प्रमाणे या वर्षी हि नेरळ शहरात मोठ्या उत्साहाने पार पडला, आपल्या लाडक्या राजाच्या जन्मोत्सव सोहळ्यात शिव प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती…
कार्यक्रमाची सुरवात १६ मार्च रोजी रात्री ११:५५ वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आली,तसेच सकाळी ८ च्या दरम्यान शिवपूजन व सायंकाळी ४ च्या सुमारास शिवजन्मोत्स्वाची मानाची मिरवणूक मोठ्या थाटा-माठात पार पडली तसेच या भव्य मिरवणुकीत खास आकर्षण म्हणजे या शिवजयंती उत्सवात श्री रामभक्त हनुमान अवतरले होते… आपली छाती फाडून आपल्या हृदयात वसलेले प्रभू श्रीराम व माता जानकी मिरवणुकीत दाखवण्यात आले.प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज… श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणांनी अवघे नेरळ गाव दुमदुमले होते… अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना अनोखी मानवंदना शिवजयंती उत्सव समिती नेरळ यांच्या वतींनी देण्यात आली…