पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-
चिखली ग्रामपंचायत येथे शासकीय जमिनीतील माती विक्रेत्या संदर्भात ग्रामपंचायत माजी सरपंच आणि माजी ग्रामसेविका यांच्या विरोधात दत्तात्रेय विठ्ठल तांडेल यांनी आमरण उपोषण चालू केले … येथे मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन झाले असल्यामुळे सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी आमरण उपोषणास मोठ्या संख्येने सहभागी झालेले असून, मोठं मोठ्याने अटक करा, अटक करा अशा घोषणा देत आहेत… ही जागा शासनाची आहे तसेच माती देखील सरकारचीच आहे, त्यामुळे माती विकणारे हे कोण…? असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे… त्याचप्रमाणे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून ताबडतोप अटक करा, अशी महिला आंदोलकांची मागणी आहे… शिवाय या अगोदर पोलीस केस केली असून पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले आहे… जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे…. या उपोषणाविषयी अधिक माहिती दत्तात्रेय तांडेल यांनी यावेळी दिली…