शिवसेना (शिंदे गट) उपनेतेपदी  संजय कदम तर विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांची वर्णी… 

0
22

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-

आज मुंबईत शिवसेना शिंदे गटाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता…. या कार्यक्रमात दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते व शिवसैनिक (शिंदे गट) आवर्जून उपस्थित होते… यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते म्हणून स्थानिक धडाकेबाज शिवसैनिक श्री. संजयराव कदम यांची एकमताने निवड करण्यात आली तर विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून श्री. किशोरभाई देसाई यांच्याकडे पदभार सोपविण्यात आले आणि उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) प्रमुख श्री. एकनाथजी‌ शिंदे यांच्या हस्ते श्री. संजयराव कदम आणि श्री. किशोरभाई देसाई यांना तसे “नियुक्ती पत्र” देण्यात आले… या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) नेते श्री. रामदासभाई कदम, मंत्री उदय सामंत, राज्यगृहमंत्री योगेशदादा‌ कदम, माजी आमदार राजन साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती….