माणगाव शिवसत्ता टाइम्स (दीपक दपके):-
दि. १७ मार्च २०२५ रोजी शिवप्रेमींकडून तिथीप्रमाणे गोरेगांवात नरेश दादा अहिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंत्ती साजरी करित संपुर्ण गोरेगांवातून लेझिम पथक व ढोल ताशांच्या गजरात रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्राची सुरुवात राजमाता जिजाऊ मैदानातून करण्यात आली होती…ही रथयात्रा छ. शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छ. शिवरायांचा पुतळा चौविस वर्षापुर्वी शिवप्रेमींनी बनविलेल्या चौथऱ्यावर बसवण्यात आला आणि शिवप्रेमींनी शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत चौक दणाणून सोडले. यानंतर पुढे संपुर्ण गोरेगांवतून जल्लोषात रथयात्रा काढत रोहिदास नगरमधील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला…यावेळी रोहिदास गर्जना परिवाराकडून आलेल्या मान्यवरांचे स्वागत व शाल देऊन सन्मान करण्यात आला…पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात या रथयात्रेची सांगता करण्यात आली…
यावेळी नरेश दादा अहिरे,शिवजयंती उत्सव कमिटी अध्यक्ष अक्षय कदम, उबाठा दक्षिण जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, उपतालुका प्रमुख मधुकर नाडकर, विजयराज खुळे, चंद्रकांत यादव, स्वीटी गिऱ्हासे, रोहित पहेलकर व असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते…