जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागाचा उपक्रम… जागो ग्राहक जागो पथनाट्यातून कलाकारांनी केली जनजागृती 

0
45

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

जागतिक ग्राहक दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड-अलिबाग,जिल्हा पुरवठा विभाग, रायगड-अलिबाग, नेहरू युवा केंद्र, रायगड व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग समुद्रकिनारा, अलिबाग बस स्थानक या ठिकाणी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. शाश्वत जीवनशैलीकडे एक न्याय संक्रमण या थीम अंतर्गत  ग्राहकांना प्राप्त असणा-या हक्कांचे जसे की, सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळवण्याचा हक्क, निवडीचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क इ.चे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्राहकांनी शासनाला सहाय करण्याबाबत, जबाबदा-या व कर्तव्ये- पावतीशिवाय माल खरेदी करताना किंमत व गुणवत्ता तपासून घेणे, तक्रार निवारणासाठी योग्य ठिकाणी दाद मागण्यास शिकावे, स्वतःची फसवणूक होऊ नये म्हणून शक्यतो काळजी घेणे इ. बाबत ग्राहकांमध्ये जागरुकता येणे आवश्यक असल्याने त्याप्रकारचे संदेश व माहिती प्रसिध्दी माध्यमांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे प्रयोजन असल्याने त्यानिमित्ताने जिल्हा पुरवठा कार्यालय रायगड अलिबाग, सहा. आयुक्त, अन्न औषध प्रशासन, पेण, सहा. नियंत्रक, वैध मापन विभाग, अलिबग येथे पथनाटय तसेच ग्राहक जनजागृतीच्या कार्यक्रमांचे जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रभारी सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी संगीता दराडे, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी व कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील  कर्मचारी तसेच सहा.आयुक्त, अन्न औषध प्रशासन, पेण व सहा. नियंत्रक, वैध मापन विभाग या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, प्रिझम संस्थेचे कलाकार विनोद नाईक, हर्षाली नागावकर, निकी बेंडे, मल्लिनाथ जामदार, वेदिका लाडगे, सेजल काठे, भक्ती गळवे, गौतमी दांडेकर, जान्हवी भंडारी व बहुसंख्य जनसमुदाय  उपस्थित होता…