23 वर्षीय महिलेने दिला चक्क तीन बाळांना जन्म… डॉक्टरांच्या टीमने केली नैसर्गिक प्रसुती…माता व बालके सुखरूप…

0
25

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रोहा तालुक्यातील पहुर गावच्या एका 23 वर्षीय महिलेने मंगळवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी तीन बालकांना जन्म दिला असून येथील डॉक्टर रामदास तरपेवाड व त्यांची टीम परिचारिका अनिता करकरे,परिचारिका वनिता तेटगुरे व सिक्युरिटी गार्ड वैशाली घोगरे यांनी या महिलेला नैसर्गिक प्रसूती यशस्वीरित्या केली असून माता व बालके सुखरूप आहेत…अशी डॉक्टरांनी माहिती दिली तसेच या टीमचे रुग्णालयीन कमिटी सदस्य नरेश राजपूत यांनी डॉक्टरांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले…रोहा तालुक्यातील पहुर गावची महिला मनीषा अक्षय काटकर वय वर्ष 23 यांना प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते…तेथील डॉक्टरांनी खर्च जास्त प्रमाणात सांगितल्याने त्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालय गाठले…तेथे दाखल केल्यानंतर डॉक्टर रामदास व त्यांच्या टीमने महिलेला तपासून नैसर्गिक प्रसुती केली आहे…तर माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे…