रोह्यात ११ वर्षीय तरुणीवर विनयभंग…रील दाखवत नकोसा स्पर्श… विनयभंग प्रकरणी सुलतान पानसरेला अटक…पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल…

0
42

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव,दीप वायडेकर):- 

रोहा तालुक्यात वरसे येथील ११ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा रोह्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे…सुलतान पानसरे असे आरोपीचे नाव असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत…आरोपीचे सिद्धार्थनगर,धावीर रोड येथे रेशन धान्याचे दुकान आहे…पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असून सुध्दा तीला आधारकार्ड लिंक करण्याच्या कारणाने दुकानात बोलावुन माबाईलमधील अश्लील रिल्स दाखवुन, तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे शरिरास हात लावुन विनयभंग केला…सदर बाबतीत पिडीतेची आई आरोपी सुलतान पानसरे यास जाब विचारण्यास गेली असता आरोपीने त्यांना दमदाटी करुन हाकलून दिले…यानंतर मुलीच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दिली… याबाबत पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाण्यात आरोपी सुलतान पानसरे याच्या विरोधात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात असून आरोपीला अटक करण्यात आली आहे…या घटनेचा पोलीस निरीक्षक मारुती पाटील अधिक तपास करीत आहेत…