रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
कोकणातील दिग्गज नेत्यांच्या हाती धनुष्यबाण देत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दणका दिलेला असतानाच, आता अजित पवारांनी रायगडात हादरे देण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवणारा उमेदवारच राष्ट्रवादी काँग्रेसने फोडला आहे. या महिला नेत्याचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीतच हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार राहिलेल्या स्नेहल जगताप या आता मशाल सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधणार आहेत..स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेश चर्चेनंतर खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला… जगताप कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी सदिच्छा भेट घेत असल्याच म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी यावर जास्त बोलणं टाळलं.माझी आणि जगताप कुटुंब यांची भेट ही केवळ नी केवळ सदिच्छा भेट होती…योग्य वेळ आल्यावर पुढील राजकीय निर्णय कळवू ..असे म्हणत जास्त बोलणं टाळलं.स्नेहल जगताप ठाकरे गटाच्या नेत्या आहेत त्यांनी महाड विधानसभा देखील लढवली आहे स्नेहल जगताप यांचे राष्ट्रवादी प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे