महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
रायगड जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका 80 वर्षीय नराधमाने तीन वर्षीय एका चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे…याबाबत सविस्तर वृत्त असे की,17 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास
रायगड जिल्ह्यातील माणगाव-गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका तीन वर्षीय चिमुरडीवर एका 80 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली…आरोपी याने लहान मुलीला चॉकलेटच अमीष दाखवून तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला…आरोपी याने स्वतःच्या राहत्या घरामध्ये लहान मुलीला बोलावून तिच्यासोबत गैर कृत्य केलं…या घटनेने तालुक्यामध्ये संतापाची लाट पसरली असून आरोपी हमजा यासीन दाभीळकर याला पोलिसांनी अटक केली असून संबंधित आरोपी विरोधात पॉक्सॉ, बलात्कार कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.