केएलइ कॉलेजमध्ये राष्ट्रीय कायदा महोत्सव… महोत्सवात मुट कोर्ट स्पर्धा आणि क्लायंट कॅन्सलिंग स्पर्धा…

0
35

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे):- 

कळंबोली येथील केएलई सोसायटीच्या केएलइ कॉलेज ऑफ लॉ तर्फे राष्ट्रीय कायदा महोत्सव स्पार्कल ६.० चे आयोजन काल २२ मार्च रोजी पार पडले…या महोत्सवात मुट कोर्ट स्पर्धा आणि क्लायंट कॅन्सलिंग स्पर्धा या दोन प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालय  दिल्ली न्यायमूर्ती श्री अरविंद कुमार, मुंबई उच्च न्यायालय न्यायमूर्ती मिलिंद जाधव, कर्नाटक उच्च न्यायालय न्यायाधीश प्रियेश दिनेश कुमार यावेळी उपस्थित होते…स्पर्धेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून ३० संघाने यात सहभाग घेतला…स्पर्धेची प्राथमिक आणि ऑक्टो फायनल फेरी दिनांक ७ व ८ मार्च २०२५ रोजी ऑनलाइन स्वरूपात पार पडली , जिथे देशभरातील नामवंत कायदेतज्ञ आणि न्यायमूर्तींनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परंतु काल केएलई कॉलेज ऑफ लॉ महोत्सवात सर्वांचेच लक्ष उपांत्य व अंतिम फेरीवर लागले होते.. यामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचे न्यायमूर्तींच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.