खांदाड येथे होळी सणाच्या प्रश्वभूमीवर मोफत “छावा” चित्रपट… जनतेचा तुफान प्रतिसाद…

0
49

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-

खांदाड येथे होळी सणाच्या निमित्त सध्या देशभर गाजत असलेला “छावा” चित्रपट रात्री दहाच्या सुमारास सोनभैरव मंदिराच्या भव्य प्रांगणात पडद्यावर दाखविण्यात आला…. हा चित्रपट येथील नामांकित ‘नव युवक मित्र मंडळ’ खांदाडचे अध्यक्ष बाळा (डिजे) पोवार व पदाधिकारी यांच्या पुढाकाराने आयोजीत केला …

तत्पूर्वी सालाबाद प्रमाणे होळी सणाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच रंगपंचमी सण संपन्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांतर्फे होळीची पूजा ठेवली जाते… त्याचप्रमाणे भक्तगणांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती…. दरम्यान प्रथमच यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम न ठेवता आगळा वेगळा उपक्रम म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित “छावा” सिनेमा दाखवण्यात आला होता….

सदर उपक्रमास माजी लोकप्रिय नगराध्यक्ष तथा येथील वॉर्ड क्र. १६ चे नगरसेवक ज्ञानदेव पोवार, सोनभैरव मंदिराचे अध्यक्ष तत्कालीन माजी ग्रामपंचायत सदस्य काशीराम पोवार, पदाधिकारी, नवयुवक मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळा पोवार, पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक व महिला मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते… होळी सणानिमित्त खांदाड येथील जनतेसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील आधारीत “छावा” हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला…. हा चिटपट पाहण्यास आलोट गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले…. दरम्यान बाळा पोवार यांनी सदर चित्रपट जनतेला मोफत दाखविल्याबद्दल त्यांचे जनतेकडून कौतुक होत आहे… “छावा” हा चित्रपट प्रोजेक्टरवर न दाखवता डिजिटल स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आल्याने सर्वांमध्ये आनंद दिसून येत होता…सदर चित्रपट पहाण्यासाठी सुमारे ४०० हुन अधीक लोकं आली असल्याचे बाळा पोवार यांनी बोलताना सांगितले…