निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने रक्तदान शिबीर… रक्तदान शिबिराला परिसरातील बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
40

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रक्तदान शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने रविवार,दि. २३ मार्च २०२५ रोजी संत निरंकारी सत्संग शाखा घणसोली आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सुमारे २३३ बांधवांनी रजिस्ट्रेशन केले असून १८५ निरंकारी भक्त एवं परिसरातील बांधवांनी रक्तदान केले…सर्वांनी मानवीयतेच्या भावनेतून मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीमुळे निरंकारी भक्तगणांमध्ये मानव सेवेची भावना दृढमूल झालेली असून ते इतर अनेक सामाजिक सेवांमध्ये निरंतर आपले योगदान देत आहेत.

या शिबिराचे उद्घाटन मा. शंकरशेठ पिंगळे (संस्थापक – न्यू बॉम्बे सिटी स्कूल एवं APMC संचालक) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबईचे माजी खासदार डॉ. संजीवजी नाईक,अनंत सुतार (माजी नगरसेवक), घनश्याम मडवी(माजी नगरसेवक), सौ. शोभाताई पाटील (माजी नगरसेविका), नितीन नाईक (मनसे अध्यक्ष घणसोली) यांची विशेष उपस्थिती लाभली. या प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक मनोहर सावंत , सदानंद पाटील (मुखी घणसोली), विनायक पडोळकर (संचालक – घणसोली), अरुण पाटील (क्षेत्रीय संचालक – मुंबई ६), मारुती कासारे (संत निरंकारी रक्तपेढी प्रभारी), रामदासशेठ पिंगळे तसेच सेक्टर मधील सर्व संत महात्मा उपस्थित होते.