मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-
अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकुरने आयपीएल-२०२५ मध्ये लक्षणीय छाप पाडली आहे… मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने विचारात घेतले नव्हते, मात्र लखनौ सुपर जायंट्स संघातील मोहसीन खान दुखापतग्रस्त झाल्याने २ कोटीच्या बेस-प्राईसवर त्याला लखनौ सुपर जायंट्स संघात प्रवेश मिळाला… पण या संधीचा शार्दुल ठाकुरने सोनं करत मानाची “परपल कॅप” देखील मिळवली आणि सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले आहे…
पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध शार्दुल ठाकुरने दोन विकेट्स घेतल्या होत्या… हैदराबाद विरुद्ध पॉवर-प्ले मध्येच अभिषेक शर्मा आणि इशान किशन सारख्या आक्रमक फलंदाजांच्या विकेट काढल्या, डेथ ओव्हर मध्ये मोहम्मद शमी आणि अभिनव मनोहर यांनाही बाद केले… आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांत शार्दुल ठाकुरने सर्वाधिक एकूण सहा विकेट्स घेतल्या आहेत… त्याने या मोसमातील एकूण दोन सामन्यातील ६ विकेट्ससह आयपीएल मधील कारकिर्दीतील ९७ सामन्यांमध्ये एकूण १०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत… शार्दुलने ४ षटकात अवघ्या ३४ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेऊन हैदराबादला बॅकफूटवर ढकलत या हंगामातील नंबर-१ गोलंदाज ठरला आहे, त्यामुळे शार्दुलला परपल कॅपने सन्मानित करण्यात आले आहे….