सुकी मच्छी विकणाऱ्या आजीबाईंच्या सोनसाखळीची चोरी… चोरी करणाऱ्या नवरा-बायकोला पकडण्यात रोहा पोलिसांना यश…

0
31

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

रोहा पोलीस ठाणे हद्दीत भागीरथी खार गोफण येथे एक वृध्द महिला नाव नीलिमा नारायण वरसोलकर, वय ६५ राहणार भागीरथीखार तालुका-रोहा, जिल्हा रायगड या सुकी मच्छी विकण्याचा व्यवसाय करतात… सदर ठिकाणी एक नवरा बायको जोडपे स्कूटरवरून येऊन थोडी सुकी मच्छी विकत घेतली व मच्छी विक्रेते हिने गळ्यात सोन्याची माळ घातल्याची पाहणी करून पुढे शेणसई बाजूकडे निघून गेले… काही वेळाने त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून सदर वयोवृद्ध महिला हिचे गळ्यातील ३ तोळ्याची सोन्याची माळ जबरदस्तीने खेचून तेथून रोहा शहराकडे पळ काढला… त्यानंतर वृद्ध महिलेने आरडाओरड केल्याने तेथील जागरूक नागरिकांनी लागलीच रोहा पोलीस ठाणे येथे सदर घटनेबाबत माहिती दिली…

पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खारी चेकपोस्ट येथे पोलीस अमलदारांसह नाकाबंदी लावली… काही वेळातच गुन्ह्यातील पळ काढणारे जोडपे खारी चेकपोस्ट येथे आले असता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्याना अडविण्याचा प्रयत्न केला असता वेगाने गाडी पळवून तांबडी गावाकडे पळून गेले…. त्यावेळी त्याठिकाणी नाकाबंदी करणारे पो.ना.शिरसाठ, पोशी अनिल पाटील, पोशी अंगद गुट्टे, पो शी मुसळे व होमगार्ड यांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरू केला… पोलीस पाठीमागे लागल्याचे पाहताच आरोपी जोडप्याने वेगाने गाडी पळविली मात्र त्याच वेगाने पोलिसांनी पाठलाग करून अत्यंत चपळाईने काही अंतरावरच त्यांना रोखून ताब्यात घेतले आणि जबरदस्तीने खेचून घेतलेली गळ्यातली सोन्याची ३ तोळ्याची सोन्याची माळ आरोपींकडून हस्तगत केली… आरोपीना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव:- १) नितीन सुरेश गुंडीये, वय-३६, रा-गोरेगाव मुंबई २) मोहिनी नितीन गुंडिये, वय-३३, सध्या रा – गोरेगाव, मुंबई असे असल्याचे सांगितले… लागलीच आरोपींना पोलीस ठाणे येथे आणण्यात आले असून, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिकचा तपास रोहा पोलीस स्टेशन करत आहे…