दापोली तालुक्याला आणखी एक मिळाले मानाचे पद…शिवदर्शन उर्फ दर्शन साठे विधीमंडळ सचिव पदी…

0
25

दापोली शिवसत्ता टाइम्स  (देवेंद्र मोरे ) :-

दापोली तालुक्यातील निसर्गरम्य असणाऱ्या आंजर्ले गावातील श्री. शिवदर्शन उर्फ दर्शन साठे यांची महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या सचिव पदी नियुक्ती झाली आहे.

दापोली तालुक्याला साठे यांच्या रुपाने पुन्हा एकदा मानाचे पान मिळाले आहे.
श्री साठे ह्यांनी कक्ष अधिकारी म्हणून सन १९९९ पासून विधिमंडळ सचिवालयात काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी अपरसचिव, उपसचिव, सहसचिव त्यानंतर सचिव पदावर आज पदोन्नती झाली..

साठे यांची सचिव पदावर बढती झाल्याने तालुक्यासाठी आणि आंजर्ले गावासाठी ऐतिहासिक क्षण निर्माण झाला आहे.आंजर्ले पंचक्रोशीतील  नागरिकांनी मनःपूर्वक अभिनंदन करीत साठे यांच्यावर खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत…