अलिबागच्या कुंडलिक खाडीत भरल्या शिडाच्या होडींच्या स्पर्धा… स्पर्धा पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित…

0
120

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज शिडाच्या होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे…या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या आहेत.शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेली 100 वर्षापासून जपली आहे. आज कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरविल्या जातात. अलिबाग तालुक्यातील आग्राव आणि अष्टगारातील कोळी बांधव  स्पर्धेत सहभागी होतात.आणि हिरकणी धन्या मल्हार या बोटीच  एक नंबर काढली आहे.