महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,’जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जिल्हा रायगड’ आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ या स्पर्धेमध्ये महाड तालुक्याला भरघोस यश प्राप्त झाले आहे… जिल्ह्यातील एकूण बक्षीसांपैकी सर्वाधिक २५ तालुकास्तरीय बक्षिसे महाड तालुक्याला प्राप्त झाली आहेत, तसेच मोठ्या संख्येने जिल्हास्तरीय बक्षिसे देखील प्राप्त झाली आहेत. डी. डी. विसपुते अध्यापक विद्यालय विचुंबे,नवीन पनवेल येथे दि.२८ मार्च २०२५ रोजी संपन्न झालेल्या शानदार सोहळ्यात डायट पनवेलचे प्राचार्य मा. इरफान इनामदार सर, नोडल अधिकारी मा. सागर तुपे सर,अधिव्याख्याते मा.संतोष दौंड सर,मा.रामदास टोणे सर,संस्थेचे अध्यक्ष मा.धनराज विसपुते साहेब,विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. कुसुम मधाळे मॅडम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
महाड तालुक्याला प्राप्त झालेल्या उज्ज्वल यशाबद्दल महाडचे गटशिक्षणाधिकारी मा.राजन सुर्वे साहेब यांनी बक्षीस पात्र सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे… बक्षीस पात्र शिक्षकांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री गंगाधर शंकर साळवी यांना मराठी विषय जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक आणि तालुका स्तरीय प्रथम क्रमांक,श्री संतोष खरात यांना गणित विषय जिल्हास्तर प्रथम व तालुकास्तर प्रथम,श्री मारुती मुकदम यांना भाषा विषयात तालुकास्तर प्रथम, श्री किशोर मनसर पाडवी तालुकास्तर प्रथम, सौ स्नेहल माळवदे यांना विषय इंग्रजी जिल्हास्तर द्वितीय, तालुकास्तर द्वितीय, विषय मराठी तालुका स्तर तृतीय, विषय विज्ञान तालुकास्तर तृतीय, अश्विनी सलगर विषय गणित जिल्हास्तर तृतीय व तालुका स्तर प्रथम, सुप्रिया सलगर तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक, स्वप्नाली गायकवाड परिसर अभ्यास तालुकास्तरीय तृतीय, सय्यद अबुबकर ताजोद्दीन भाषा तालुकास्तरीय प्रथम अशी भरघोस बक्षिसे प्राप्त झाली आहेत…
बक्षिसाचे स्वरूप सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व बँक खात्यात जमा होणारी रक्कम असे आहे… ‘ज्ञानासाठी आत या आणि सेवेसाठी बाहेर जा’ असे ब्रीद असणाऱ्या आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक धनराज विसपुते सर, डायटचे प्राचार्य इरफान इनामदार सर, नोडल अधिकारी सागर तुपे सर, अधिव्याख्याते संतोष दौंड सर यांनी बक्षीस पात्र सर्व विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले… तुम्ही रायगड जिल्ह्यात या पहिल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील पहिले मानकरी आहात याचा तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो आहे, असे देखील यावेळी ते म्हणाले… महाड तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने तंत्रस्नेही शिक्षक श्री संतोष खरात सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले… त्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक व्हिडिओचे सभागृहात सादरीकरण करण्यात आले…