अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात एका 33 वर्षीय विवाहित महिलेची साडी ओढून अश्लिल शब्द वापरीत विनयभंग केला असल्याची तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात पीडित महिलेने दिनांक ३१/०३/२०२५ रोजी आरोपी विरोधात केली आहे…
याबाबत सविस्तर वृत्त असे की,अलिबाग शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात दिनांक ३१ मार्च रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास पीडित महीला ही मच्छिसाठी बर्फ घेऊन घराकडे येत असताना त्यांच्या मागे त्याच गावातील आरोपी आला व त्याने साडी ओढून अश्लिल शब्द वापरीत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे…याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७४,७५,७६,७९ प्रमाणेदाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलीस उप निरीक्षक शिंदे या करीत आहेत.