उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील नरेश पंढरीनाथ पाटील यांच्या घरावर सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजता दरोडा पडला… दरोडेखोरांनी १० लाखाचे दागिने आणि एक लाख रुपायांची रोकड लंपास केली आहे… सदर घराचे मालक एका कार्यक्रमासाठी बाजूच्या गावात कुटुंबासह गेले होते… रात्री ११ वाजता घरी परतल्यावर दरवाजे उघडे असल्याचे दिसून आले आणि कपाट फोडून सामान अस्ताव्यस्त पडले होते… सदरचा प्रकार बघताच नरेश पाटील यांनी तात्काळ उरण पोलीस स्टेशनला तक्रार दिली… त्यानंतर घटनास्थळी उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत मिसाळ दाखल होऊन तात्काळ गुन्हा दाखल करून पंचनामे सुरू केले आहेत व फॉरेन्सिक टिमला पाचारण करण्यात आले आहे… तसेच उरण पोलीस स्टेशनने आठ दिवसा पुर्वी पत्रक प्रसिद्धी करून चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन केले होते…. सदर चोरी प्रकरणाचा उरण पोलीस स्टेशन गांभीर्याने तपास करीत असून चोरांना गजाआड करण्यात येणार आहे…