अविनाश म्हात्रे यांची राज्य सल्लागार पदी निवड… मोहिनी मिन्नाथ पाटील यांची विभागीय उपाध्यक्ष पदी निवड…

0
26

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-

कळंबोली पनवेल येथील प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ अविनाशजी म्हात्रे यांची महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या राज्य सल्लागार पदी तर नवीन शेवे शाळेच्या शिक्षिका मोहिनी मिन्नाथ पाटील यांची कोकण विभाग महिला मंच उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व राज्य सरचिटनिस हरीश ससनकर, प्रदीप पवार जिल्हा नेते रत्नागिरी यांचे हस्ते शाल, स्मृतिचिन्ह व नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला…स्थानिक व्ही.के.हायस्कूल, पनवेल येथे 31 मार्च रोजी झालेल्या जिल्हा कार्यकारिणी सभेत सदर सत्कार समारंभ पार पडला.

यावेळी मार्गदर्शनात अविनाश म्हात्रे यांनी संघटनेत माणसे किती आहे यापेक्षा कशी आहे हे आज महत्वाचे आहे, आम्ही शिक्षक हितासाठी संघर्षरत असलेल्या पुरोगामी परिवारात सहभागी होऊन समाधानी आहोत,आजच्या काळात शिक्षक कार्यकर्त्यांनी अभ्यासू बनले पाहिजे असे विचार व्यक्त केले…संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा देत कोकण विभागात पुरोगामी विचार पोहचवण्याचे आवाहन केले…यासह जिल्हा व तालुका शाखानी मोजक्या समस्या घेऊन लढा सुरू ठेवा, शाळा व शिक्षक टिकले पाहिजे हेच आपले ध्येय असले पाहिजे असे विचार मांडले. राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी म्हात्रे सरांच्या अनुभवाचा लाभ संघटनेला मिळत आहे त्यामुळे आम्हाला कार्याची दिशा मिळत आहे असे विचार मांडले.

सत्कार कार्यक्रमाचे संचालन सौ.पुष्पां वसंत मोकल यांनी तर आभार प्रदर्शन सुनील देशमुख जिल्हा कोषाध्यक्ष यांनी केले सभेचे आयोजन वसंत मोकल जिल्हाध्यक्ष, विश्वास ठाकूर जिल्हा कार्याध्यक्ष, दत्तात्रय भोंडकर पनवेल तालुका अध्यक्ष, समीर धाडवे तालुका सरचिटणीस पनवेल, यांनी केले तर यशस्वीतेसाठी जनार्दन गावंड, विकास गायकवाड, कल्याण कोळी, अनिल कदम, संतोष पाटील, अजय पाटील, अमित पातरुटकर, नरेश पाटील, अनंत म्हात्रे, श्वेता पाटील जिल्हा महिला सरचिटणीस, गुलाब गावंड महिला संघटक, श्रीम.ज्योती घोसाळकर महिला संघटक,शंकर पारंगे, लतिका म्हात्रे संदीप पाटील,श्री.कमलाकर जकाकोरे, श्री.राजेंद्र पाटील, श्री. शंकर रेवे, महिला संघटक, व सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा रायगड यांनी विशेष प्रयत्न केले…