वरसोलीत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा… ग्रामस्थांच्या उपस्थित टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक…

0
12

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील विद्यानगर येथे सोमवार दि. 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले होते…सायंकाळी सहा वाजता ग्रामस्थांच्या उपस्थित टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली…तसेच गुरुवर्य श्री नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) स्थापित मठ सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्र्स्ट विद्यानगर,वरसोली येथे श्रीस्वामी समर्थ प्रकट दिन व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्यातर्फे पालखीचे देखील आयोजन केले होते…31 मार्च रोजी पहाटे सहा वाजता श्रींच्या मूर्ती व पादुकांवर अभिषेक, सकाळी दहा ते अकरा वाजता होमहवन,दुपारी बारा ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान महाप्रसाद ठेवण्यात आला होता…मिरवणूक सोहळा झाल्यानंतर सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान पादुका व दर्शन सोहळा पार पडला… या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी परिवारासह लाभ घेतला…