पेण शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रायगड जिल्ह्यातल्या पेण शहरातील प्राइड सिटी या सात मजली इमारती मधील लिफ्ट अचानक ब्रेक फेल होऊन खाली जात जोरात आदळल्याने यामधील २ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे…या सोसायटी मध्ये जवळजवळ २३५ सदनिकाधारक राहत असून फक्त दीड वर्षच या इमारतीला झाल आहे…मात्र बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे लिफ्टची ऑडिट न झाल्यामुळे अपघात झाल्याची तक्रार येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे… इमारतीचा ताबा घेतल्यापासून येथील नागरिकांनी वारंवार बिल्डरकडे लिफ्ट निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार सुद्धा केली होती…