पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-
सुकापूर येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले… यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे, माजी पंचायत समीती सभापती काशिनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायणशेठ घरत, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिवा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते… यावेळी बाळाराम पाटील आणि राजेश केणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले…